MNS workers at MVA Protest: शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ मविआचं आज मुंबईत जोडे मारो आंदोलन होत आहे. यावेळी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत लाँग मार्च काढला जाणार आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्तदेखील पाहायला मिळेल. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.महत्वाच्या नेत्यांना गेटवे ऑफ इंडियाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जावू दिले जाणार असा मुंबई पोलिसांचा प्लॅन आहे. आजच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी नाहीय. असे असले तरी मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला होता. विधानसभा निवडणूक मात्र स्वबळावर लढवण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. विधानसभेला मनसेने 225 ते 230 उमेदवार रिंगणात उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ निषेध नोंदवला. तसेच पुतळ्याच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. पुतळ्याच्या अवमानप्रकरणी मविआच्या आंदोलनात मनसेने आपला सहभाग नोंदवला नाहीय. असे असताना मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरलेला दिसल्याने चर्चेला उधाण आले.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा जो अवमान झालाय ती खरंच संतापजनक घटना आहे. याचा निषेध करण्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय, असे मनसेच्या कार्यकर्त्याने सांगितले. महायुतीदेखील या घटनेचा निषेध करतेय. पण मी शिवप्रेमी म्हणून या घटनेचा निषेध नोंदवतोय, अशी प्रतिक्रिया त्याने झी 24 तासकडे नोंदवली.
महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात महायुतीकडूनही राज्यभरात आंदोलन केलं जातंय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह महाराष्ट्रभरात महायुतीकडून आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनातून महाविकास आघाडीचा निषेध केला जाणार आहे.
मुंबईत आज महाविकास आघाडीचं 'जोडे मारा आंदोलन' आणि मोर्चा असल्यामुळे गेटवे ऑफ इंडिया बंद राहणार. सकाळी 10 वाजल्यापासून गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. मोर्चा असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याकरिता गेट ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाची सांगता होणार आहे.
मुंबईत भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात दादरमध्ये आंदोलन केलं जात आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेलवण यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. मविआच्या आंदोलनाविरोधात भाजपचं आंदोलन सकाळी 9 वाजल्यापासून दादरमध्ये आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी कोल्हापूरचे शाहिर शुभम विभूते व सहकलाकार पोवाडे सादर करतील.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.