ठाकरे सरकारविरोधात मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन

 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार आहे.  

Updated: Jun 11, 2020, 02:45 PM IST
ठाकरे सरकारविरोधात मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन title=

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारला जागे करण्यासाठी हॉर्न वाजवा (MNS Horn OK Please) आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आधीच संकट ओढवले आहे. वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहीऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेलं राज्य सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली.

कोरोना संकट आणि त्यात लॉकडाऊमुळे डबघाईला आलेल्या वाहतूक व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने दंड थोपटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन एका अभिनव आंदोलनाने राज्य सरकारला जागे करायचे आहे. शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न वाजवणार आहे.  'फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन' हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारे आंदोलन असेल, असे संजय नाईक म्हणालेत.  

महाराष्ट्र सैनिकांनी तसेच वाहनचालक - मालकांना आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलन करताना #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरा आणि आंदोलन यशवी करावे, असे आवाहन वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी केले आहे. त्याचवेळीहे आंदोलन एक संधी आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या पक्षाला, आपल्याला डिवचलं आहे, चिडवलं आहे त्यांना आपली लढवय्या ओळख दाखवण्याची संधी असल्याचे ते म्हणालेत.