मुंबई रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी, दोघांना अटक

विविध रेल्वे स्थानकांवर गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनात वाढ झालीय. मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद होऊन पोलीस आता गुन्हाही नोंदवत आहेत. 

Updated: Aug 22, 2017, 10:46 PM IST
मुंबई रेल्वे स्थानकात  मोबाईल चोरी, दोघांना अटक title=

मुंबई : विविध रेल्वे स्थानकांवर गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनात वाढ झालीय. मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद होऊन पोलीस आता गुन्हाही नोंदवत आहेत. 

१६ ऑगस्टला कांजूरमार्ग इथे वास्तव्याला असलेल्या राजेश डिसूझा या प्रवाशाचा मोबाईल कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर चोरीला गेला. त्यांनी कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी सुरेश चव्हाण आणि शिवनारायण पाल या सराईत चोरांना अटक केली. 

हे दोघेही तरूण ड्रग्जच्या आहारी गेलेत. त्यांच्याकडून पोलिसांनी शिताफीने ७९ हजारांचा मोबाईल आणि तीन हजार रूपये पोलिसांनी हस्तगत केले. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून कुर्ला लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.