मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन

Amir Malik gets call from Dubai : EDच्या अटकेत असलेले असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Updated: Mar 17, 2022, 08:39 PM IST
मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन title=

मुंबई : Amir Malik gets call from Dubai : EDच्या अटकेत असलेले असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक  (Nawab Malik) यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा फोन दुबईतून आल्याची माहिती त्यांचा मुलगा फराज मलिक याने दिली आहे. त्याने दावा केला आहे की, तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. (Money laundering case: Amir Malik gets call from Dubai,  for bail of Nawab Malik)

बिटकॉईनमध्ये पैसे द्या, अशी मागणी झाल्याचेही मंत्री नवाब यांचा मुलगा फराज मलिक यांने सांगितले. पैशाची मागणी केल्याबद्धल फराज मलिक यांने विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी इम्तियाज नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. नवाब मलिक हे सध्या मनी लाँर्डिंग प्रकरणात EDच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे, असे पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले.  नवाब मलिक यांना गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

नवाब मलिक यांचा मुलगा अमीर मलिक याने दिलेल्या तक्रारीनंतर व्हीबी नगर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधी आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने इडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली आहे. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. नवाब मलिकांपुढे रितसर जामीन करण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याचे आदेश न्यायालयाने दिले.