मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वारंवार राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातच त्यांनी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. यापाठीमागे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी या हालचाली आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल यांनी केला. दरम्यान, जयंत पाटील यांचा राष्ट्रपती राजवटीचा आरोप बिनबुडाचा पलटवार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकारणाला जोर आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती असल्याचं फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होते. फडणवीस यांनी राज्यपालांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलीय. तर जयंत पाटलांचा राष्ट्रपती राजवटीचा आरोप बिनबुडाचा असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलाय.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहोचला आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरून यासंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा, एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबाबत लवकरच शिफारस मंजूर करण्याची शक्यता आहे. २८ मेपूर्वीच उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेचा सदस्य होणं बंधनकारक आहे.