Mumbai Crime : मुंबई 14 वर्षाच्या मुलाने एका वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चांदिवली (Chandivali) परिसारत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. मुंबईतील चांदिवली परिसरात एका 14 वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांची गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नववीच्या विद्यार्थ्याने वृद्धाला धडक दिल्याने व्यावसायिक कायदेशीर सल्लागार असलेल्या वृद्धाचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्धाला मुलाने दोनदा चिरडलं होतं. पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी दंड ठोठावला असून मुलावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
6 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज गेल्या आठवड्यात समोर आले होते. गाडी इमारतीतून बाहेर पडताना मुलाचे नियंत्रण सुटले. गाडीने बाहेर येताच रिक्षाला धडक देऊन तिथून जात असलेल्या व्यक्तीला दोनदा चिरडले. या अपघातात सुभरामन कृष्णन (63) हे गंभीररित्या जखमी झाले.
चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशने एस्कवर (पूर्वीचे ट्विटर) या अपघाताचे सीसीटीव्ही पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिस आणि मुंबई वाहतूक पोलिसांना टॅग करण्यात आले आहे. याप्रकरणी साकी नाका पोलिसांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
A 14-year-old hits a senior citizen at Nahar Amrit Shakti Road, Chandivali. Senior citizen is now advised to go on bedrest for the next 3 months. Parents penalised for 5K. This is a major safety concern for pedestrians when parents hand over their cars to kids. @CPMumbaiPolice… pic.twitter.com/TzkIJsr3wl
— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) September 13, 2023
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे दिसत आहे. सोसायटीच्या गेटमधून गाडी बाहेर काढताना मुलाकडून गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीचा वेग अचानकपणे वाढला. त्यानंतर गाडीने रस्त्यावरून जात असलेल्या वृद्ध व्यक्तीला चिरडलं. पुढे गेल्यानंतरही रस्त्यावरून ही गाडी वेडीवाकड्या पद्धतीने वेगाने पुढे गेली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याप्रकरणी गुन्हा न दाखल झाल्याने सुभरामन कृष्णन यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. "मी मरणापासून वाचलो असलो तरी, मी पूर्णपणे अंथरुणाला खिळलो आहे. डॉक्टरांनी मला तीन महिने न हलण्याचा सल्ला दिला आहे. मला माझ्या दैनंदिन कामे करण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करावी लागेल. अल्पवयीन मुलाने चालविलेल्या कारने मला दोनदा खाली चिरडले. 4.15 च्या सुमारास शेजारच्या इमारतीला जाण्यासाठी गेटमधून बाहेर पडताच हा अपघात झाला. गाडी मागून येत होती आणि अचानक धडक दिल्याने मी खाली कोसळलो. मी उठण्याचा प्रयत्न केला पण कारने दुसऱ्यांदा धडक दिली. माझी पत्नी आणि मुलाने त्याच रात्री पोलिसांकडे तक्रार केली पण त्यांनी फक्त आमचे म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी अल्पवयीन मुलगा किंवा त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला नाही, असे सुभरामन कृष्णन यांनी म्हटलं