Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक

Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.   

Updated: Jan 29, 2023, 08:25 AM IST
Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक
mumbai and Bandra Kurla Complex air pollution Very dangerous for Mumbaikars mumbai air more toxic mumbai aqi at 325 marathi news

Mumbai Air Highly Polluted  : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबईची हवा पुन्हा एकदा बिघडली आहे. (Mumbai News ) त्यामुळे मुंबईकरांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी 'सफर' या संकेतस्थळाच्या शनिवारच्या अहवालानुसार मुंबईतील हवा ही धोकादायक पातळीवर आली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये मुंबईतील हवा दिवसेंदिवस खराब होतं चालली आहे. सध्या मुंबईतील हवा ही प्रदूषित ते अतिप्रदूषित पातळीवर आली आहे. शहरातील हवा निर्देशांक 325 वर पोहचलं आहे. याचा अर्थ मुंबईतील हवा ही अतिप्रदूषित झाली आहे.  सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुंबईचं व्यवसायीक हब वांद्रे – कुर्ला संकुलात प्रदूषके आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (mumbai and Bandra Kurla Complex air pollution Very dangerous for Mumbaikars mumbai air more toxic mumbai aqi at 325 marathi news)

'या' भागात अधिक धोका 

कुलाबा
माझगाव
अंधेरी
चेंबूर
मालाड
नवी मुंबई 

ही आहे कारणं 

गेले दोन वर्ष कोरोनामुळे मुंबईत थांबली होती.  लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार आणि काम ठप्प झालं होतं. आता दोन वर्षांनंतर रेंगाळलेली कामं झपाट्याने पूर्ण करण्यासाठी अचानक सगळ्या कामांना वेग आला आहे.  कोव्हिड गॅपनंतर, पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटसह बांधकाम असो किंवा मेट्रो रेल्वेचे काम, बांधकाम व्यावसायिकांकडून उभारण्यात इमारती यामुळे अचानक मुंबईत धुळीचं कण वाढले आहे. त्याच हवामानातील बदल, दाट धुक्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. 

या भागात हवा निर्देशांक

वांद्रे-कुर्ला संकुल 403 एक्यू

आयचेंबूर 359 एक्यूआय

अंधेरी 333 एक्यूआय

कुलाबा 319 एक्यूआय

मालाड 317 एक्यूआय

माझगाव 309 एक्यूआय

भांडूप 215 एक्यूआय

बोरिवली 221 एक्यूआय

वरळी 180 एक्यूआय

नवी मुंबई 362 एक्यूआय

मुंबई 325 एक्यूआय