मुंबईतील ३ नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी पालिकेचा पुढाकार

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नद्यांच्या पुरुज्जीवनासाठी नवे सल्लागार नेमण्याची घोषणा करण्यात आलीय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 6, 2018, 03:54 PM IST
मुंबईतील ३ नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी पालिकेचा पुढाकार title=

मुंबई : मुंबईत शहरातून वाहणाऱ्या दहिसर, पोईसर आणि ओशिवरा तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेनं कंबर कसली आहे. गेल्या शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी नवे सल्लागार नेमण्याची घोषणा करण्यात आलीय. 

25 लाख रुपयांची विशेष तरतूद

शिवाय त्यासाठी 25 लाख रुपयांची विशेष तरतूदही करण्यात आली आहे. सल्लागारांना नद्यांमधील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी काम देण्यात येणार आहे. शिवाय नद्यांच्या किना-यावर सुशोभिकरणाची जबाबदारीही नव्या सल्लागारांना देण्यात येणार आहे. 

मुंबईतील पाणी साचणे थांबणे आवश्यक

दर पावसाळ्यात मुंबई शहरात मोठा पाऊस झाला, तर हमखास पाणी साचतं, हे टाळण्यासाठी या आधी देखील मिठी नदीतील गाळ काढण्यावर मुंबई महापालिकेकडून जोर देण्यात आला आहे.