Bhandup News: आपल्या लहान मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे, याची प्रचिती भांडूपमध्ये आली आहे. येथे अत्यंत दुर्देवी अशी घटना घडली. भांडुपमध्ये खेळता खेळता एक मुलगा खुल्या गटारात पडला. या गटारात बुडून मुलाचा मृत्यू झाला आहे.
कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे मयत मुलाचे नाव असून तो अवघ्या दीड वर्षांचा होता. काल संध्याकाळी या ठिकाणी हा मुलगा खेळत होता. खेळत असताना तो या गटारात पडला आणि बुडाला. एक दीड तासाने जेव्हा कुटुंबाने शोधाशोध केली तेव्हा गटारात या मुलाचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मात्र याला पालिका जबाबदार असून या अगोदर वारंवार तक्रार करून ही गटार साफ केले गेले नाही, गटार खुले ठेवले असल्याने पालिका याला जबाबदार असल्याचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
भांडुप मध्ये उघड्या गटारात पडून दीड वर्षाच्या कृष्णा गुप्ता या मुलाचा मृत्यू झाला आहे. याचा निषेध म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे भांडुप चे उमेदवार शिरीष सावंत प्रचार स्थगित करुन पालिका एस
विभागात दाखल झाले आहेत. गेले दीड ते दोन तासांपासून पालिका मनसेचे पदाधिकारी सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांची वाट पाहत आहेत मात्र सहायक आयुक्त भेटण्यास देखील येत नाहीये, जो पर्यंत कारवाई होत नाही आम्ही इथेच आहोत, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू अशी प्रतिक्रिया या बाबत मनसेचे नेते आणि भांडुप चे उमेदवार शिरीष सावंत यांनी दिली.
गोराईच्या बाबर पाडा येथे महाराष्ट्रात पर्यटन विकास विभागाच्या भागात हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करुन डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले आहे. पण अद्याप या मृतदेह कुणाचा आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. गोराईच्या बाबर पाडा येथील शेफाली गावाजवळ मृतदेहाचे तुकडे असलेली गोणी सापडली. ही गोणी झुडुपांमध्ये टाकण्यात आल्यामुळे मृतदेह कुजल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. यावेळी नागरिकांनी शोध घेतल्यानंतर त्यांना ही गोणी सापडली. गोणीत मृतेदह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी गोणी उघडताच त्यांना त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहे.
ठाणे जिल्ह्यात सात वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशकुमार रामरक्षा जयस्वाल 20 वर्षांचा असून सात वर्षांच्या मुलीला चॉकलेट आणि आइस्क्रिम दाखवून तिला इमारतीच्या छतावर नेलं. तेथे 2 नोव्हेंबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर आरोपी रमेशकुमारने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे, BNS चे कलम 64 (बलात्कार), 65 (2) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.