Mumbai Corona Update | हुश्श! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट, पाहा एकूण किती पॉझिटिव्ह?

मुंबईकरांसाठी आणि पर्यायाने महानगरपालिका प्रशासनासाठी (BMC) मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.   

Updated: Jan 15, 2022, 08:46 PM IST
 Mumbai Corona Update | हुश्श! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट, पाहा एकूण किती पॉझिटिव्ह?   title=

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि पर्यायाने महानगरपालिका प्रशासनासाठी (BMC) मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. मुंबईत शुक्रवार 14 जानेवारीच्या तुलनेत आज 15 जानेवारीला 600 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांच्या आकड्यात क्वचित वाढ झाली आहे. (mumbai corona update 15 january 2022 today 10 thousand 661 corona cases found in city)

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 661 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 11 हजार 317 इतका होता. तर 9 जण दगावले होते.

>

किती रुग्ण बरे झाले?

दिवसभरात तब्बल 21 हजार 474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 10 हजारांनी कमी झाली आहे.  आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 84 टक्के  रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तर फक्त 722 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. 

मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी

1 जानेवारी -  6 हजार 347

2 जानेवारी -  8 हजार 063

3 जानेवारी -  8 हजार 082

4 जानेवारी - 10 हजार 860

5 जानेवारी - 15 हजार 166 

6 जानेवारी - 20 हजार 181

7 जानेवारी- 20 हजार 971

8 जानेवारी- 20 हजार 318

9 जानेवारी - 19 हजार 474

10 जानेवारी - 13 हजार 648

11 जानेवारी - 11 हजार 647

12 जानेवारी - 16 हजार 420 

13 जानेवारी - 13 हजार 702

14 जानेवारी - 11 हजार 317 

15 जानेवारी - 10 हजार 661