मालाड स्थानकाबाहेर राडा! आई वडिलांसमोरच मनसैनिकाला जीव जाईपर्यंत मारहाण

Mansainik Murder:  जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री 12 वाजता आकाशची प्राणज्योत मालवली.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 14, 2024, 09:16 PM IST
मालाड स्थानकाबाहेर राडा! आई वडिलांसमोरच मनसैनिकाला जीव जाईपर्यंत मारहाण
मालाडमध्ये मनसैनिकाची हत्या

Mansainik Murder: मुंबईच्या मालाड पूर्वे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी जबर होती की त्यात मनसैनिकाचा जीव गेला. आकाश माईन असे या मनसैनिकाचे नाव होते. तो 27 वर्षांचा होता. आकाश काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेला होता. येथून तो परत येत असताना मालाड पूर्वेत स्टेशनजवळ त्याला रिक्षावाल्याने कट मारली. मनसे कार्यकर्ता आकाशने रिक्षावाल्याला याबद्दल जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

Add Zee News as a Preferred Source

दहा ते बारा जणांच्या घोळक्याकडून मारहाण

मलाड स्टेशनवर रिक्षा चालकाला त्याच्या फेरीवाल्या मित्रांची साथ मिळाली. त्यांचा दहा ते बारा जणांचा ग्रुप तयार झाला. हे सर्वजण आकाश मोईन याच्यावर तुटून पडले. सर्व बाजुने आकाश मार घात होता. पोटच्या लेकाला मार खाताना पाहून आई आकाशच्या अंगावर झोपली. वडीलदेखील मध्ये आले. पण घोळका आकाशला मारहाण करत राहिला. काहीजण त्याला लाथा बुक्क्यांनी मारु लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. 

 ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल पण..

रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री 12 वाजता आकाशची प्राणज्योत मालवली. या हल्ल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. 

आकाशच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तत्परता दाखवा

मनसेकडून पोलिसांवर आरोप करण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवली. 3 आरोपीना अटक केली आहे तर इतर आरोपीचे शोध घेतला जातोय. त्याप्रमाणे पोलिसांनी आकाशच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तत्परता दाखवावी, असे आवाहन मनसैनिकांनी केले आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More