Manoj Jarange : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सत्तेत असलेल्या महायुती सरकारने घोषणा आणि योजनांचा पाऊस पाडला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच मराठा आंदोकल मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनसाठी MMD फॉर्म्युला दिला आहे.
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनसाठी मनोज जरांगे यांनी 'MMD फॉर्म्युला' दिला आहे. 'मराठा,मुस्लिम,दलित एकत्र आल्यास सत्तापरिवर्तन होईल असं जरांगे यांनी म्हंटले आहे. हाच मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला आहे. येवल्यांमध्ये मनोज जरांगे यांनी हा MMD फॉर्म्युला दिला आहे. ओबीसी,अठरापगड जातींनीही एकत्र यावं असं आवाहन देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
मराठा समाजाचा प्रश्न न सोडवल्यास राज्यात उलथापालथ केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा जरांगेंनी दसरा मेळाव्यात दिलाय. दस-याला इशारा दिल्यानंतर जरांगे यांनी आता सामाजिक अभिसरणाचा प्रयोग राबवत आहेत. सत्ता बदल करण्यासाठी मराठा,मुस्लिम आणि दलित आणि अठरापगड जातींनी एकत्रित येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनेक ठिकाणी जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका बसला होताच. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास सत्ताधारी पक्षांचे सर्व उमेदवार पाडणार असा इशारा पुन्हा एकदा जरांगेंनी दिलाय.
जरांगे यांनी निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र,भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही,असं वक्तव्य शिंदे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलंय. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी फक्त मराठा समाजावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासोबतच दलित आणि मुस्लिमांची मोट बांधण्याचा प्रयत्न जरांगे करतायत..
ओबीसींमध्ये 17 जातींचा समावेश केला, याचा ओबीसीला धक्का लागला नाही का?... आमच्यात येऊ नका म्हणणारे आता कुठे आहेत? असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी नारायणगडावरून मंत्री छगन भुजबळांवर केलाय. मराठा समाजाला आरक्षण देताना महाविकास आघाडीकडून लिहून घ्या असं म्हणत होते. मात्र, आता 17 जातींचा समावेश केला तेव्हा महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का? असा थेट सवाल जरांगेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवींसाना विचारलाय.
BRN
102(19.4 ov)
|
VS |
RWA
35/1(6 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.