चूक कोणाची? भरधाव बसची डम्परला धडक, अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ

नशीबच म्हणावं या कार चालकाचं....एक सेकंदही उशीर झाला असता तर.... बस-डम्परचा भीषण अपघात, व्हिडीओ

Updated: Oct 27, 2021, 05:53 PM IST
चूक कोणाची? भरधाव बसची डम्परला धडक, अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ

मुंबई: दादरच्या किंग सर्कल परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवानं कार चालक थोडक्यात वाचला आहे. त्या कार चालकानं तर अक्षरश: मृत्यू जवळून पाहिला आहे. या संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षता येऊ शकते. 

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दादर सर्कलजवळ आज सकाळी सव्वा सात वाजता झाला. बस आणि डम्पर एकमेकांना धडकले. भरधाव बस डम्परवर धडकली. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं आहे. तर पुढे असणाऱ्या कारच्या मागच्या भागाचं नुकसान झालं असावं असं सांगितलं जात आहे. 

या अपघातात पाहू शकता की बसने डम्परला ठोकल्यानंतर बसमधून एक जण बाहेर पडताना दिसत आहे. तर या अपघातात 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बस चालक गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या प्रकरणाची दखल घेतली. 

अपघातानंतर जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात थोडक्यात कार चालक वाचला. मात्र बसचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.