Railway Megablock News in Marathi: ऐन होळीच्या दिवशी मुंबईकरांना लोकलची गर्दी आणि लेटमार्कला सामोरे जावं लागणार आहे. कारण रविवारी (24 मार्च) मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांनी होळीच्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच वेळापत्रक एकदा तपासून घ्या...
मध्य रेल्वेवरील माटुंगा - मुलुंड या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलदा मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील.परिणामी या लोकल 15 मिनिटे उशीराने धावतील.
तसेच सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव येथे थांबून लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. डाऊन धिम्या मार्गावरील ब्लॉक पुर्वीची शेवटची लोकल टिटवाळा आहे. सकाळी 9.53 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल सुटेल. ब्लॉकची पहिली लोकल आसनगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल दुपारी 3.32 वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. डाउन हार्बर मार्गावरील ब्लॉक पूर्वेकडील शेवटची लोकल पनवेल लोकल आहे. सकाळी 10.18 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल शटल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल दुपारी 3.44 वाजता सुटेल ब्लॉक कालावधीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला आणि पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.