Mumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या...

Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Mar 19, 2023, 08:24 AM IST
Mumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या... title=
MEGA BLOCK March 19, 2023

MEGA BLOCK March 19, 2023 : रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड देखभालीसाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी (19-03-2023) मध्य रेल्वेच्या (central megablcok) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल काही काळ उशिरा धावणार आहे. तुम्ही जर आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी प्लॅन करत असाल तर सर्वात आधी मुंबई लोकलचं (mumbai local) वेळापत्रक जाणून घ्या...

मध्य रेल्वेवर असा असेल मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 03.55 पर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.40 या वेळेत धावणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे  नेहमीच्या मार्गावर वळवण्यात येतील. 

तर सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. 

आज हार्बर प्रवाशांना दिलासा

आज सुट्टीच्या दिवशी हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. या मार्गावरील लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. 

रविवारी मध्यरात्री रेल्वेचा ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक 

मध्य रेल्वेवर 140 टी रेल्वे क्रेनच्या साहाय्याने कुर्ला स्थानकावर 8 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्ड बसवण्यासाठी हार्बर मार्गावर रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (19 मार्च ) मध्यरात्री 11.50 ते पहाटे 4.20 दरम्यान अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द रेल्वेचा ब्लॉक असणार.