मुंबई : चर्चगेट ते विरार उन्नत मार्गाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आलाय. मुंबईत लांब पल्ल्याचा लोकल प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. आसनगाव आणि बदलापूरपर्यंत चार मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
येत्या काही दिवसात कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. कल्याण आणि आसनगाव दरम्यान मुंबई रेल्वे विकास महामंडाळच्या माध्यमातून चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय.
तर कल्याण आणि बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका बांधण्याचाही विचार एमआरव्हीसीनं सुरू केलाय. त्याचप्रमाणे बोरीवली-विरार हा मार्ग सहापदरी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
हे मार्ग झाल्यास प्रचंड गर्दीतून प्रवास करणाऱ्या चाकरमानींना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान चर्चगेट ते विरार उन्नत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तूर्तास बासनात गूंडाळून ठेवण्यात येणार आहे.