Mumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र, यात तुमचं नाव तर नाही?

Mhada Lottery 2023 : मुंबईतील म्हाडामध्ये अर्ज करण्यांसाठी महत्त्वाची बातमी...म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे अपात्र अर्जाची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 18, 2023, 08:01 AM IST
Mumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र, यात तुमचं नाव तर नाही? title=
mumbai mhada lottery Draw 2023 list of applications ineligible Last date is 19th July Objection claims online

Mhada Lottery 2023 : मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता म्हाडाकडून अर्ज केलेल्या पात्र आणि अपात्रांची प्रारूप (Mumbai MHADA Lottery Draw 2023) यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे तुमचं नाव कोणत्या यादीत आहे आजच जाणून घ्या. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे. या यादीनुसार 527 अर्जदारांचा अर्ज अपात्र ठरले आहेत. 

जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर अजूनही संधी गेलेली नाही.  म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करुन 'My lssue' या मेूनमध्ये जाऊन 'Raise Grievance' हा पर्याय वापरुन हरकती दावे तुम्हाला ऑनलाइन नोंदविता येणार आहे. यासाठी म्हाडाने अर्जदारांना उद्या म्हणजे 19 जुलै 2023 दुपारी 3.00 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. (mumbai mhada lottery Draw 2023 list of applications ineligible Last date is 19th July Objection claims online)

मुंबईतील 4082 घरांच्या विक्रीच्या ऑनलाइन लॉटरीला उदंड प्रतिसाद दिसून आला आहे. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन यापरिसरासाठी ही लॉटरी आहे. या घरांसाठी  1 लाख 45 हजार 849 ऑनलाइन अर्ज मिळाले आहेत. या प्रक्रियेतील अंतिम यादी 24 जुलैला दुपारी 3 वाजता housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

तर मुंबई मंडळाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी निघण्याची शक्यता आहे. त्यानुसार म्हाडाकडून तयारी सुरु झाली असल्याचं म्हटलं जातं आहे.