Mumbai News : मुंबईतील सर्वात मोठे फ्लॅट्सचे Deal, 23 आलिशान फ्लॅट 1200 कोटींना विकले

Mumbai luxury homes sold : मुंबईत आत्तापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झाली आहे. वरळीत थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवरमध्ये 23 फ्लॅट्सची तब्बल 1200 कोटींना विक्री झाली आहे. डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत.  

Updated: Feb 5, 2023, 02:38 PM IST
Mumbai News : मुंबईतील सर्वात मोठे फ्लॅट्सचे Deal, 23 आलिशान फ्लॅट 1200 कोटींना विकले  title=
Representative photos

Mumbai 23 luxury homes sold : मुंबईत आत्तापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झाली आहे. (Big Flats Deal in Mumbai ) वरळीत थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवरमध्ये 23 फ्लॅट्सची तब्बल 1200 कोटींना विक्री झाली आहे. (23 luxe flats sold for Rs 1,200 crore in Mumbai ) DMart चे संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि जवळच्या सहकाऱ्यांनी डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. (Mumbai 23 luxury homes sold for Rs 1,200 crore)

हे फ्लॅट्स सुहाना बिल्डर्सने विकले आहेत. यातला प्रत्येक फ्लॅट 5000 स्क्वेअर फुटांचा आहे. सर्व सुखसोयींनीयुक्त अशा या फ्लॅट्सची प्रत्येकी किंमत 50 ते 60 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या फ्लॅट्सची विक्री डिस्काऊंटसह झाल्याचे या क्षेत्रातले जाणकार सांगतात. या खरेदीबाबत पाच महिने वाटाघाटी सुरु होत्या. अखेर शुक्रवारी या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि निकटवर्तीयांसाठी 23 फ्लॅट्स खरेदी केलेत. त्यांची किंमत साधारणपणे 1200 कोटींच्या घरात आहे. 

DMart च्या संस्थापकांची इतकी मालमत्ता

थ्री सिक्स्टी वेस्टमधील काही मोठ्या अपार्टमेंट्सची यापूर्वी सुमारे 75-80 कोटी रुपयांना विक्री झाली होती. गतवर्षी, IGE (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने जवळपास 151 कोटी रुपयांना प्रकल्पातील दोन अपार्टमेंट्स खरेदी केले होते, अशी माहिती आहे. डीमार्टच्या दमानी यांनी गेल्या काही वर्षांत निवासी ( Residential) मिळवल्या आहेत. राधाकृष्ण दमानी आणि त्यांचे भाऊ यांनी दक्षिण मुंबईतील नारायण दाभोलकर रोड येथे 1,001 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला होता. हा बंगला मलबार हिलमध्ये सुमारे 60000 चौरस फूटांचा असून तो 1.5-एकर जमिनीवर आहे.  तसेच 2021 च्या उत्तरार्धात, अलिबाग जवळच्या एका गावात सहा एकरांचे बीचफ्रंट घर सुमारे 80 कोटी रुपयांना विकत घेतल्याची माहिती आहे.