आधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकी

Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.

राजीव कासले | Updated: Apr 19, 2024, 04:00 PM IST
आधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकी title=

Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर 14 एप्रिलला गोळीबार (Firing) केल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधल्या (Gujrat) भूज इथून नाट्यमय रित्या आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली बाईक आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपीचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंध आहेत का? याचा पोलीस तपास करतात. हे प्रकरण शांत होत नाही तोच नवं प्रकरण समोर आलं आहे. सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. 

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमान खानला दुसऱ्यांदा धमकी देण्यात आलीय. एका व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बूक करुन ती सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पाठवली. 

काय आहे नेमकी घटना?
एका व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) नावाने ओला कॅब बूक केली. ओला कॅबला सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचा पत्ता देण्यात आला होता. बुकिंग केल्यामुळे ओला चालक सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पोहोचला. अपार्टमेंटच्या गेटजवळ कार थांबवल्यानंतर ओला ड्रायव्हरने तिथल्या सुरक्षा रक्षकाला लॉरेन्स बिश्नोई नावाच्या व्यक्ती इथ राहातो को विचारलं. कारण त्याच नावाने कार बूक करण्यात आली होती आणि पत्ता गॅलेक्सी अपार्टमेंटचा देण्यात आला होता. सलमान खानच्या घरापासून वांद्रे पोलीस स्थानकापर्यंत कारचं बुकिंग करण्यात आलं होतं. 

सुरक्षा रक्षकाने केला पोलिसांना कॉल
ओला चालकाने लॉरेन्स बिश्नोईचा नाव घेताच गॅलेक्सी अपार्टमेंटचा सुरक्षा रक्षक अलर्ट झाला. त्याने तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी कॅब ड्रायव्हरची माहिती घेतली. तपाासानंतर ओला कॅब बूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमधून अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कार बूक करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित त्यागी असं असून तो वीस वर्षांचा आहे. वांद्रे पोलिसांनी रोहितला अटक केली असून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी त्याचा संबंध आहे का याबाबत तपास केला जात आहे.

सलमान खान पडला घराबाहेर
दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान पहिल्यांदा घराबाहेर पडला. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमासाठी सलमान खान दुबईला गेलाय. मुंबई विमानतळावर तो कडेकोट सुरक्षेव्यवस्थेत दिसला. कारमधून उतरण्यापूर्वी बॉडिगार्ड शेरा आणि इतर सुरक्षा रक्षकांनी सलमानभोवती कडं केलं. त्यानंतर सलमान विमानतळाच्या दिशेने रवाना झाला.