मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती

Mumbai Water Supply:  मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात  कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Mar 26, 2024, 02:22 PM IST
मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती title=
Mumbai Water Supply

Mumbai Water Supply: गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर पाणी समस्येला सामोरे जात आहेत. कधी धरणातील पाणी साठा कमी कर कधी पाईपलाईन दुरुस्तीचे काम या सर्वामुळे मुंबईकरांना 15-20 टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागला. दरम्यान ही पाणीकपात कायम राहणार का? असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. दरम्यान मुंबई पालिकेकडून यासंदर्भात महत्वाची अपडेट आलीय. जून ते सप्‍टेंबर २०२३ दरम्‍यान झालेल्‍या कमी पर्जन्यमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा तुलनेने कमी झालेला आहे. असे असले तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात  कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्‍य शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्‍ध करून दिले आहे. सद्यस्थितीत मुंबईकरांच्‍या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नसल्याचे मुंबईपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. 

येत्‍या पावसाळयापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा 

मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयात यासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या उच्‍चस्‍तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्‍यात आला. येत्‍या पावसाळयापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल अशारितीने नियोजन करण्यात आले असल्याचे महानगरपालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मतदान ओळखपत्रासाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज आणि डाऊनलोड

पाणीकपातीचा प्रस्ताव नाही

धरणातील उपलब्‍ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. राज्‍य शासनानेदेखील निभावणी साठ्यातून महानगरपालिकेस पाणीपुरवठा करण्‍याचे यापूर्वीच मान्‍य केले आहे. सद्यस्थितीत पाणीकपात करण्‍याचा बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा कोणताही प्रस्‍ताव नाही.

पाण्याचा वापर जपून करा 

तुर्तास कोणती पाणीकपात नसली तरी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने वापर करावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईने बीजिंगलाही मागे टाकलं! 'एवढ्या'श्या जागेत राहतात सर्वाधिक अब्जाधीश; थक्क करणारी आकडेवारी पाहाच