ओला-उबर चालक संपावर, प्रवाशांचे होणार हाल

अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी ओला-उबर चालकांनी संप पुकारला आहे. सोमवार मध्यरात्रीपासून ओला-उबर चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 19, 2017, 10:15 AM IST
ओला-उबर चालक संपावर, प्रवाशांचे होणार हाल title=

मुंबई : अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी ओला-उबर चालकांनी संप पुकारला आहे. सोमवार मध्यरात्रीपासून ओला-उबर चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

संप तीव्र करण्याच्या उद्देशाने अनेक चालक राष्ट्रीय मिल मजदूर संघात सहभागी होण्याची चिन्हं आहेत. मुंबईत सध्या ओला-उबरच्या ३० हजार कॅब सुरु आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची भीती आहे. दरम्यान, चालकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करु असं आश्वासन चालकांना देण्यात आलं आहे.