close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई : वाहून गेलेल्या चिमुकल्याचा शोध सुरुच, वडिलांचा खळबळजनक आरोप

गोरेगावमध्ये गटारात पडलेल्या तीन वर्षांच्या दिव्यांशचा अजूनही शोध सुरुच आहे.  

ANI | Updated: Jul 12, 2019, 03:36 PM IST
मुंबई : वाहून गेलेल्या चिमुकल्याचा शोध सुरुच, वडिलांचा खळबळजनक आरोप

मुंबई : गोरेगावमध्ये गटारात पडलेल्या तीन वर्षांच्या दिव्यांशचा अजूनही शोध सुरुच आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासन दबाव आणत असल्याचा दिव्यांशच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या अक्षरश: जीवावर उठला आहे. त्यात महापौर विश्वानाथ म्हाडेश्वर यांनी याला नागरिकच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गटावरचे झाकट काढून टाकण्यास नागरिकांचा हात आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे यावरुन वाद निर्माण झाला आहे.

गोरेगावमध्ये गटारात पडलेल्या तीन वर्षाच्या दिव्यांशचा शोध थांबलेला नाही. पण यामध्ये महत्त्वाचे म्हणजे पोलीस आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप दिव्यांशच्या वडिलांनी केला आहे. बुधवारी रात्री दिव्यांश उघड्या गटारात पडला. जवळपास २४ तास उलटले तरी तो अद्याप सापडलेला नाही. मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या अक्षरश: जीवावर उठला आहे. 

दिव्यांश ज्या गटारात पडला ते ३ ते ४ फूट खोल होते. त्यातच पावसामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नसल्याचे पुढे आले आहे. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.