Big News : यंदा दसरा मेळावा नाही? पाहा नेमकी कोणत्या कारणांमुळे अडलीये गाडी

Dasra Melava 2022 : यंदा विचारांचं सोनं लुटता येणार नाही? 

Updated: Sep 23, 2022, 08:09 AM IST
Big News : यंदा दसरा मेळावा नाही? पाहा नेमकी कोणत्या कारणांमुळे अडलीये गाडी  title=
Mumbai police might not give permission for shivsena dasra melava 2022

Dasra Melava 2022 : बहुप्रतिक्षित दसरा मेळाव्यासाठी मुंबईत कोणालाही कुठेही परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचं आता स्पष्ट होत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांकडून मेळाव्यासाठी परवानगी न मिळण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवरून दोन्ही गटात (uddhav thackeray Eknath shinde) आधीच वाद न्यायालयात पोहोचला आहे. इतर ठिकाणी परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे सर्वकाही टाळण्यासाठी दोन्ही गटांना पोलीस (Mumbai Police) परवानगी न देणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Mumbai police might not give permission for shivsena dasra melava 2022)

दसरा मेळाव्याच्या (shivsena dasra melava 2022) ठिकाणी सुरक्षा दिली जाऊ शकते, मात्र सभास्थळी पोहचण्यापर्यंत रस्त्यात दोन्ही गट एकमेकांसमोर येऊ शकतात. एकाच गटातून दोन्ही गट निर्माण झाले आहेत त्यामुळे प्रत्येक विभागात दोन गट आहेत आणि त्यामुळेच मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचताना वाद विवाद होऊ शकतो. याचा प्रत्यय गणपती विसर्जन मिरवणुकीत दादरला (Dadar) आला आहे. त्यामुळे पोलीस कोणालाच परवानगी देण्याच्या मनस्थितीत नाहीत अशी माहिती आहे. 

अधिक वाचा : Economic Recession: प्रगत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, वैश्विक आर्थिक मंदीचा भारतावर काय परिणाम? 

 

यंदा विचारांचं सोनं लुटता येणार नाही? 
विचारांचं सोनं लुटण्यासाठी सुरू झालेला दसरा मेळावा यंदाच्या वर्षी मात्र तणाव निर्माण करणारा ठरत आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने दोघांनीही शिवाजी पार्क मैदान दासरा मेळाव्यासाठी मागितले होते मात्र महापालिकेने पोलिसांकडून अहवाल मागवला आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते कारण देत मेळाव्याला परवानगी नाकारली याबाबत आज कोर्टात सुनावणी होणार आहे. तर सत्तेत असलेला शिंदे गट पोलिसांवर दबाव आणून परवानगी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे मत आहे तर आम्ही घुसून मेळावा करू किंवा गनिमी कावा ने मेळावा कार्य अशी विधान दोन्ही गटाकडून येत असल्याने पोलीस देखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत

काय आहे ठाकरे गटाचा प्लान बी? 
न्यायालयाकडून परवानगी मिळाली तर ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा प्लॅन बी तयार आहे.  महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव चौपाटीसह अनेक पर्याय आहे. ठाकरे गट कोर्ट निकालानंतरच पत्ते खोलणार असल्याच समजत आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji park) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की नाही? यावर  मुंबई हायकोर्ट (Mumbai High Court) निर्णय देणार आहे. मात्र, ठाकरे गटाने  कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्लॅन बी तयार ठेवला आहे.