मुंबई : कोरोना संक्रमणासंदर्भातील नियम तोडून बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पार्टीचा प्रकार समोर आलाय. रात्री साधारण ३ वाजता मुंबई पोलिसांनी अंधेरीच्या मोठ्या क्लब ड्रॅगन फ्लायवर छापा टाकला. इथे पार्टी सुरु होती. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. पोलिसांचा छापा पडल्यानंतर सेलिब्रिटी मागच्या दाराने पळाले.
गायक गुरु रंधावा (Guru Randhawa), सुजैन खान (Sussanne Khan)आणि रॅपर बादशाह (Badshah ) यावेळी उपस्थित होते. हे सर्व मागच्या दाराने पळाले. पोलिसांनी ३४ जणांना ताब्यात घेतलंय. यावेळी सुरेश रैना देखील उपस्थित होता अशी माहिती सुत्रांनी दिलीय. मुंबईत नाईट कर्फ्यू लागू आहे. अशावेळी या लोकांनी नियमांचे उल्लंघन केलंय.
या पार्टीत १९ जण दिल्ली आणि पंजाबमधून आले होते. या व्यतिरिक्त दक्षिण मुंबईतूनही काहीजण या पार्टीत सहभागी होते. पोलिसांनी एकूण २७ ग्राहक आणि ७ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ताब्यात घेतलेल्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलंय. तर दिल्लीहून आलेल्यांना सकाळी ७ वाजता पुन्हा पाठवण्यात आले.
एका पब पार्टीच्यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्याने पार्टीदरम्यान कोरोना नियमांचे पालन केले नसल्याचे पबमध्ये दिसला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रैनासह इतर अनेक सेलिब्रिटींनीही कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. मुंबई पोलिसांनी सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पंचतारांकित हॉटेल क्लबमधील पार्टी दरम्यान सुरेश रैना यांच्यासह अनेकांनी ना मास्क घातला होता ना सामाजिक अंतर पाळले जात होते.
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या करिता प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जारी केली आहे. मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी काल रात्री एका पंचतारांकित हॉटेलवर केलेल्या कारवाईत क्रिकेटर सुरेश रैनासह एकूण ३४ जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.