मुंबई : भीमा-कोरेगावमधील हिंसाचारानंतर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रेल रोको करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलीये.
पश्चिम रेल्वेवरील आंदोलनाप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने १३ गुन्हे दाखल केले आहेत. तर मध्य रेल्वेवर पोलिसांकडून रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शांततामय मार्गाने बंद पाळण्याच्या नेत्यांच्या सूचना धुडकावून लावत आंदोलकांनी ठिकठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवरील वाहतूक बुधवारी कोलमडून गेली. याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे आता पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारलाय.