Mumbai Railway Mega block : लोकल म्हणजे मुंबईची (Local Mega Block) लाईफलाईन. लोकल बंद झाली म्हणजे भलतंच टेन्शन. मुंबईची वर्दळ एकाऐकी थांबायची. अशातच येत्या रविवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी ट्रान्सहार्बर (Transharbour) आणि हार्बर मार्गांवर (Harbor routes) मेगा ब्लॉक चालवणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक (Mega Block) असणार आहे. (Mumbai Railway Mega block Important news for those traveling by train Mega Block will be on routes)
ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील (down harbor route) सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 4) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. रविवारी मेन लाईनवर मेगा ब्लॉक (Mumbai Railway Mega block) असणार नाही.