महत्त्वाची बातमी | पाणी प्रश्नावर मुंबईकरांना मोठा दिलासा

पाणीपट्टीबाबतची ही बातमी वाचा, थेट पैशांशी आहे संबंध....   

Updated: Oct 29, 2020, 05:06 PM IST
महत्त्वाची बातमी | पाणी प्रश्नावर मुंबईकरांना मोठा दिलासा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : पाण्याच्या प्रश्नावरुन मुंबईकरांचे अनेक प्रश्न अनेकदा समोर आले आहेत. त्यातीलच एका प्रश्नाबाबत मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. पाणी वापरावर नियंत्रण आणण्याकरता दुरेक्ष दर पद्धतीनुसार होणा-या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळून लावल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी पाणीदरात होणारी ८ टक्के वाढही कोरोनामुळं होणार नसल्याचं पालिका प्रशासनानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

पुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार प्रती व्यक्ती दररोज १५० लिटर इतका पाणी वापर हवा, परंतु मुंबईत अनेक इमारतींमध्ये दररोज दरोडोई पाणी वापर हा १५० लिटरपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळं या जास्तीच्या पाण्याला दुरेक्ष दर पद्धतीनुसार जास्त दर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला होता. तसंच ओसी नसलेल्या इमारतींमध्येही पुरवठा होणा-या पाणीदरातही याचप्रमाणे वाढ केली जाणार होती. 

 

सध्या दरडोई १५० लिटर पाणी वापरणा-यांना १ हजार लिटरसाठी ५.२२ रूपये दर आहे. तर १५० ते २०० लिटर पाणी वापरणा-यांसाठी १०.४४ रूपये इतका दर आहे, ज्याचा प्रस्तावीत दर १०.४४ रूपये इतका होता. तर २०० ते २५० लिटर्सकरता १५.६६ वरून २६.१० रूपये इतका आणि २५० हून अधिक लिटरकरता २०.८८ वरून ३१.३२ रूपये इतका दर प्रस्तावित होता. परंतु स्थायी समितीत हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं ही दरवाढ होणार नाही.