Mumbai Water Problem News in Marathi : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झाले आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते. मुंबईमध्ये पालिकेच्या वतीनं लागू होणाऱ्या लहानसहान बदलांचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत असतो. शहरातील नागरिकांवर परिणाम करणारी अशीच एक बातमी नुकतीच समोर आली आहे.
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी असून बोरिवली टेकडी जलाशयाचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे काम 9 जानेवारीला दुपारी 1 ते रात्री 9 दरम्यान होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण, आर उत्तर विभागातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तसेच पुढील दोन दिवस गढूळ पाणी येत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
1) आर / दक्षिण -महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गाव आणि समता नगर-सरोवा संकुल, कांदिवली (पूर्व). (पाणीपुरवठ्याची वेळ 6.25 ते सायंकाळी 8.25)
2) आर / मध्य - ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व).(पाणीपुरवठ्याची वेळ 5.30 ते सायंकाळी 7.30)
3) आर / उत्तर – शिववल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर पार्क, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर, राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोई कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग , वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्सचेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेशर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व). (पाणीपुरवठ्याची वेळ 4.40 ते सायंकाळी 7.40)
4) आर / उत्तर – आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ति नगर, सद्गुरु छाया लेऊट बंगाली पाडा, महाकालीवाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंद नगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक वर्णन, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक वर्णन, किसान नगर, वर्मान औद्यगिक प्रकरण, डायमंड इंडसी, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा पंपिंग, दहिसर (पूर्व). (पाणीपुरवठ्याची वेळ 6.25 ते सायंकाळी 8.25)