मुंबई: दादर स्टेशनवर चालत्या लोकलमधून उतरताना प्रवासी गंभीर जखमी

हमीद जेवल असं या प्रवासी व्यकीचं नाव असून, तो मुळचा बांगलादेशचा आहे

Updated: Aug 20, 2018, 11:11 AM IST

दादर: 'अती घाई संकटात नेई' याचा प्रत्यय दादर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला नुकताच आला. दादर रेल्वे स्थानकात चालत्या गाडीतुन उतरण्याचा प्रयत्न हा प्रवासी करत होता. मात्र, हा प्रयत्न फसल्याने प्रवासी गंभीर जखमी झालाय.. फलाट क्रमांक चारवर ही दुर्घटना घडली.

हमीद जेवल असं या प्रवासी व्यकीचं नाव असून, तो मुळचा बांगलादेशचा आहे. हमीद जेवल गाडीतून पडताच फलाटावरील पोलीस शिपायी तापोळे यांनी तातडीनं त्यांना पकडलं. त्यामुळे हमीद यांचा जीव वाचला.