मालगाडीचा डबा घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मुंबईकडे येणारी जलद गतीची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Dec 6, 2017, 08:06 PM IST
मालगाडीचा डबा घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मुंबईकडे येणारी जलद गतीची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पारसिक बोगद्यात मालगाडीचा डबा घसरला आहे. त्यामुळे ही लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावर १० ते १५ मिनिटे उशीराने लोकल धावत आहेत. ऎन गर्दीच्या वेळेला ही घटना घडल्याने चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.