Ganesh Festival 2022: मुंबईतील 'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा; भक्तांनाही मिळणार कव्हरेज

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच आहे. अशात मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ (richest ganeshutsav mandal) म्हणून ओळख असलेलं GSB सेवा (GSB Seva Mandal)  मंडळ सध्या चर्चेत आहे. 

Updated: Aug 29, 2022, 10:32 PM IST
Ganesh Festival 2022: मुंबईतील 'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा; भक्तांनाही मिळणार कव्हरेज title=

Ganesh Chaturthi 2022: महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच आहे. अशात मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ (richest ganeshutsav mandal) म्हणून ओळख असलेलं GSB सेवा (GSB Seva Mandal)  मंडळ सध्या चर्चेत आहे. 

मुंबईतील GSB सेवा गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या आगमनाआधीच चर्चेत आलंय. मुंबईतील किंग्स सर्कल येथील GSB सेवा मंडळाने तब्बल 316.4 कोटींचा विमा उतरावल्याने हे मंडळ सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

GSB सेवा मंडळातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला सोन्यानं मढवलं जातं. म्हणूनच एकूण विम्यापैकी 31.97 कोटींची रक्कम बाप्पाच्या सोनं, चांदी आणि इतर दागिन्यांसाठी रिस्क इंश्युरन्स म्हणून ठेवली गेली आहे.

या मंडळात काम करणारे कार्यकर्ते, पुजारी, आचारी, व्हॅले पार्किंगसाठी नियुक्त कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांसाठी तब्बल 263 कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. 

मंडळातील मंडप, मैदान आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 20 कोटींचा विमा उतरवला गेला आहे. 

गेल्या काही काळात सोन्या चांदीच्या दारांमद्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतेय. मुख्यत्वे म्हणूनच हा विमा उतरवला गेला आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा होणार आहे. म्हणून यंदा गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विम्याचा एक मोठा भाग हा मंडळात काम करणारे कर्मचारी आणि स्वयंसेवकांची उतरवला गेल्याचं मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ GSB सेवाचे प्रवक्ता अमित पै यांनी सांगितलं. 

यंदाही भाविक बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घेऊ शकणार आहेत, मात्र यंदा दर्शनासाठी रेऑर्डब्रेक गर्दी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच यावेळी भाविकांना बाप्पाचं दर्शन सुलभ होण्यासाठी तब्बल 3300 स्वयंसेवक वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करणार आहेत. 

यंदा गणपतीच्या मूर्तीवर 66 किलो सोनं, 295 किलो चांदीची आणि इतर मौल्यवान धातूंची आभूषणं असणार आहेत. यंदाची गणेशाची मूर्ती माती आणि गवताची असणार आहे आणि त्यावर नैसर्गिक वॉटरकलरने रंगकाम केल्यासही माहिती समोर आली आहे.

Mumbais GSB Mandal buys insurance worth Rs 316 cr for upcoming festival