घटस्थापनेच्या मुहूर्तावर राजकारणात ३ मोठ्या घडामोडी

आजच्या घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यात तीन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नारायण राणे कुडाळमध्ये आज आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत.

Updated: Sep 21, 2017, 11:28 AM IST
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राजकारणात ३ मोठ्या घडामोडी title=

मुंबई : आजच्या घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यात तीन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नारायण राणे कुडाळमध्ये आज आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत.

काँग्रेस नेते नारायण राणे आज पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणार असले तरी राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. राणेंच्या प्रवेशाच्या हालचालीही भाजपामध्ये सध्या दिसत नाहीत. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी राणे काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

शाहु मार्केट यार्ड इथ नव्या संघटनेचा नारळ फोडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकडे राज्यातील शेतकऱ्यांच लक्ष लागून राहिलं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोण कोणते कार्यकर्ते सदाभाऊ खोत यांच्या पाठीशी रहाणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे. 

तर राज ठाकरे आज रविंद्र नाट्यमंदिर मध्ये आपल्या फेसबुक पेजचं अनावरण करतायत. राज ठाकरेंच्या फेसबुक एन्ट्रीचा टीझर नुकताच मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आला आहे. “व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असे टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी रेखाटलेली व्यंगचित्र फेसबुकच्या माध्यमातून कुणा-कुणावर वार करतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.