मुंबई : नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे, आणि एकाप्रकारे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे, य़ावर शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नारायण राणे म्हणाले, 'मला भाजपने उमेदवारी दिली. मी राज्यसभा खासदार झालो. त्यामुळे आता शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडायला हवं होतं.'
नारायण राणे शिवसेनेवर टीका करताना म्हणाले, 'जसं सांगतात तसं वागत नाही. त्या पक्षाला शिवसेना म्हणतात. भाजपने मला राज्यसभा दिली आहे. त्यामुळे आता हिंमत असेल, तर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर जाऊन दाखवावं. पण शिवसेना आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाही.'
दुसरीकडे, भाजपच्या विजया रहाटकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा अर्ज मागे घेतल्यानंतर राज्यसभेची निर्माण झालेली चुरस संपल्यात जमा आहे. कारण, राज्यातील ६ जागांसाठी आता फक्त ६ उमेदवार आहेत. तसेच आता नारायण राणेंच्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यात भाजपाचे तीन आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार आहे. मात्र, ऐनवेळी रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली होती.