मुंबई : पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणार्या भाजपाच्या आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातील वक्तव्यावर भाजपाचे आशिष शेलार यांनी टिका केल्यानंतर राजकीय पटलावर जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले. राष्ट्रवादीकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवणाऱ्या आशिष शेलार यांना रोहित पवार यांनी खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू...आहेत त्या आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर.. विनोदीच आहे सगळं, अशी जळजळीत टीका शेलार यांनी केली होती.
राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू...आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 1, 2020
त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले की, सुरुवातीला भाजपचे दोनच खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत. राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले "अच्छे दिन" हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले "बुरे दिन" हे अशाच अहंकाराचं फळ आहे. #आत्ता_तरी_सुधरा_राव @ShelarAshish https://t.co/aIMXaZEiSr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020