मुंबई : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. राज्यातल्या राजकीय घडामोडींबाबत या बैठकीत चर्चा होते आहे. पवार उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. युतीच्या सत्तास्थापनेत तिढा निर्माण झालाय. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. आजच्या बैठकीला सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंती पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, प्रफूल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे उपस्थित आहेत.
शिवसेनेला केवल अडीच वर्षेच नव्हे तर पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची संधी असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. तर यापूर्वीही विधिमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्तीही मुख्यमंत्री झालेली आहे, असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. तसंच शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीत नेमकं काय ठरतं यावर पुढची राजकीय समीकरणं अवलंबून असल्याचं अजित पवारांनी नमूद केलं आहे.