नवी मुंबई ते अलिबाग फक्त 75 मिनिटात, वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात

जलवाहतूकीमुळे पर्यटाकांची आणि प्रवाशांचा बहुमुल्य वेळ वाचणार आहे. तसेच ट्राफिक आणि खड्ड्यांमुळे सहन करावा लागणारा मनस्तापापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. 

Updated: Nov 26, 2022, 09:09 PM IST
नवी मुंबई ते अलिबाग फक्त 75 मिनिटात, वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : अलिबाग म्हणजे पर्यटकांची पहिली पसंती. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने आणि वनडे रिटर्न ट्रीप शक्य असल्याने अनेक पर्यटक अलिबागला आवर्जून जातात. मात्र रस्ते मार्गे गेल्यानंतरही धूळ-प्रदूषणाचा सामना करावा लागतो. तसेच मुंबई, नवी मुंबईहून किमान 2-3 तास प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरली खड्ड्यांमुळे पर्यटाकांचा हिरमोड होतो. मात्र आता नवी मुंबई ते अलिबाग फक्त 75 मिनिटात जाता येणार आहे. (new mumbai belapur mandva water taxi service know time table and ticket fare details)

बेलापूर ते मांडवा या वॉटर टॅक्सी (belapur mandva water taxi) सेवेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी 20 पेक्षा अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतलाय. जलवाहतूकीमुळे पर्यटाकांची आणि प्रवाशांचा बहुमुल्य वेळ वाचणार आहे. तसेच ट्राफिक आणि खड्ड्यांमुळे सहन करावा लागणारा मनस्तापापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. 

सध्या ही वॉटर टॅक्सी सेवा शनिवार-रविवार अशा 2 दिवसच असणार आहे. या वॉटर टॅक्सीचे तिकीटदर प्रतिमाणशी 300 रुपये असणार आहे. ही वॉटर टॅक्सी सकाळी बेलापूरवरुन 8 वाजता सुटेल ती मांडव्याला 9 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल. तर संध्याकाळी मांडव्याहून 6  वाजता सुटणारी वॉटर टॅक्सी 7 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल.