काहींना वाटतं खेळ संपला पण... निलेश राणेंच आणखी एक ट्विट

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर ट्विट 

Updated: Nov 27, 2019, 11:32 AM IST
 काहींना वाटतं खेळ संपला पण... निलेश राणेंच आणखी एक ट्विट  title=

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निलेश राणेंनी ट्विट करून आपली भावना व्यक्त केली होती. फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस अवघे 78 तासांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील राजीनामा दिला.

राज्यातील परिस्थितीवर गेले अनेक दिवस निलेश राणे ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधत होते. या निलेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य करणारत ट्विट केलं आहे. 'काहींना वाटतं खेळ संपला पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच,' असं सूचक वक्तव्य निलेश यांनी केलं आहे.

अजित पवार आपल्या गटासह देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापनेसाठी गेले होते. मात्र आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने बहुमत असफल झाले. तसेच महाराष्ट्रविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवस सुनावणी करून बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश फडणवीस सरकारला दिली होती. मात्र बहुमत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला. आणि यानंतर महाराष्ट्रविकासआघाडीने सरकार स्थापनेसाठी तयार दर्शवली. असं असताना भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर चहुबाजुंनी टीका केली असताना निलेश राणेंच ट्विट चर्चेत आलं आहे. 

निलेश राणेंनी या अगोदरही ट्विट केलं होतं. निलेश राणेंनी ट्विट करून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. 'काँग्रेसवाले आजच्या तारखेत उद्धवला आणि संज्याला नागीण डान्स करायला सांगितलं तरी ते दोघ करणार. पण एका गोष्टीच वाईट वाटलं शिवसैनिकांना ओळख परेड करुन आरोपी सारखं दोन हॉटेल बदलून आणल गेलं आणि काँग्रेसवाल्यांनी शपथ घ्यायला लावली.'अशी टीका केली आहे.