भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं नाव घेतलं जातं. नुकताच मुकेश आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळ्या मोठ्या थाट्या माट्यात पार पडला. अख्खा जगभरात या लग्नाची चर्चा सुरु होती. या लग्नाला देशविदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज आम्ही तुम्हाला नीता अंबानी यांच्या आयुष्यातील असं गुपित सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. नीता अंबानी यांना मुकेश अंबानी यांना नाही तर एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करायच होतं.
नीता अंबानी यांनी खुद्द त्या व्यक्तीच नाव सांगितलंय. हे गुपित सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर हा व्हिडीओ एका जुन्या मुलाखतीचा आहे. सिमी गरेवालच्या शो Rendezvous with Simi Garewal मध्ये जेव्हा नीता आणि मुकेश अंबानी पाहुणे म्हणून आले होते.
या शोदरम्यान, अभिनेत्री सिमीने नीता अंबानींना मुकेश अंबानींव्यतिरिक्त कोणासोबत डेटवर जायला आवडेल असा प्रश्न विचारला. तेव्हा नीता यांनी बिल क्लिंटन या व्यक्तीसोबत डेटवर जाण्याचा इच्छा व्यक्ती केली.. बिल क्लिंटन हे अमेरिकेचे 42 वे राष्ट्राध्यक्ष राहिलेय. नीता यांचं उत्तर ऐकून मुकेश अंबानींनी अवाक् झाले आणि त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'जर नीताला या डेटवर जायचं असेल तर सिमी, मला तुझ्यासोबत डेटवर जायचंय.' त्यावर सिमी यांनी डेटवर जाण्यास तयार असल्याचे सांगितलं.
मुकेश अंबानी यांच्यासाठी नीता यांची निवड धीरूभाई अंबानी केली. एका डान्स शोमध्ये नीताचा परफॉर्मन्स पाहून धीरूभाई अंबानी प्रभावित झाले आणि त्यांनी नीता यांच्या घरी फोन केला. तेव्हा तो फोन नीता यांनी उचलला, मी धीरूभाई अंबानी बोलतोय, असं म्हटल्यावर नीता यांना वाटलं की, हा प्रँक कॉल आहे. त्यांनी तो डिस्कनेक्ट केला. परत त्यांनी फोन केला आणि तो नीता यांच्या वडिलांनी उचलला. त्यांना सांगितलं की, मी खरंच धीरूभाई अंबानी बोलतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं की, नीताला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं तेव्हा नीताला वाटले की कदाचित आपल्या कंपनीत नोकरी देऊ इच्छितो, मात्र त्यांनी मुलगा मुकेश याच्याशी तिची ओळख करून दिली.
नीतालाही मुकेशचा नम्र स्वभाव आवडायचा पण तिला लग्नाची खात्री नव्हती. मुकेश यांनीही नीता यांना पसंत करून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केलं. एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, 'नीता ही पहिली मुलगी होती जिला भेटल्यानंतर त्यांनी ठरवले होते की ती त्यांची जीवनसाथी बनेल.' तसंच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, मुकेश यांनी सिग्नलवर कार थांबली असताना नीता अंबानी यांना लग्नाची मागणी घातली.
मुकेश यांच्यासोबत लग्नाला हो म्हणण्यापूर्वी नीता यांनी एक अट घातली होती. नीता यांनी लग्नानंतरही काम करणार असल्याचं सांगितलं आणि मुकेश यांनी नीता यांची अट मान्य केली. 1985 मध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं लग्न झालं.