फटाक्यांवर बंदी आणणार नाही- रामदास कदम

 राज्यात फटाक्यांवर बंदी आणणार नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 08:10 PM IST
फटाक्यांवर बंदी आणणार नाही- रामदास कदम

मुंबई : राज्यात फटाक्यांवर बंदी आणणार नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. हिंदूंच्या सणांवर निर्बंध येतील असं पाप आपण आणि शिवसेना करणार नसल्याचंही कदम यांनी नमूद केलं. तर दुसरीकडे कोर्टानं लादलेल्या फटाके बंदीच्या विक्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. शांततेचा अतिरेक सुरू असून यामुळं अंतोषाचा उद्रेक होणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.