जुने दागिने सोनाराकडे मोडताना जीएसटी लागणार नाही

तुमचे जुने दागिने सोनाराकडे मोडताना त्यावर जीएसटी लागणार नाही.जीएसटीसंदर्भात पसरलेल्या गैरसमजांवर सध्या सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मोहीम आखलीय

Updated: Jul 14, 2017, 04:09 PM IST
 जुने दागिने सोनाराकडे मोडताना जीएसटी लागणार नाही

मुंबई : तुमचे जुने दागिने सोनाराकडे मोडताना त्यावर जीएसटी लागणार नाही.जीएसटीसंदर्भात पसरलेल्या गैरसमजांवर सध्या सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मोहीम आखलीय. त्याच एक भाग म्हणून दिलेल्या स्पष्टीकरणात केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. 

जुने दागिने मोडणे हा व्यवसायचा भाग नाही. त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार नाही. त्याचप्रमाणे जुन्या कार विकण्यावरही जीएसटी लागणार नाही. सरकारनं दिलेल्या स्पष्टीकरणा जीएसटी कायद्याच्या कलम 9 मध्ये त्यासाठी आवश्यक ते बदल केल्याचंही हसमुख अढियांनी स्पष्ट केलंय.