राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, अमित शहांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातलं भाजप-शिवसेनेचं युती सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय.

Updated: Jun 16, 2017, 10:32 PM IST
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, अमित शहांचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : महाराष्ट्रातलं भाजप-शिवसेनेचं युती सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया अमित शहांनी दिली आहे. तसंच भाजपवर कडवट टीका केल्यानंतरही शिवसेना सरकारमध्ये असल्याचा टोला अमित शहांनी लगावला आहे.  झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ.उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत अमित शहांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चांवर खुद्द भाजप अध्यक्ष अमित शहांनीच प्रतिक्रिया दिली आहे. राणेंनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचार करू असं अमित शहा म्हणाले आहेत.