पाणीपुरवठा बंद! मुंबईकरांनो सगळी कामं सोडून आधी 'ही' बातमी वाचा

उन्हाळा संपण्याच्या टप्प्यावर असतानाच आता मुंबई शहरातील काही भागांत पाणीपुरवठ्याची अडचण भासू शकते. 

Updated: Jun 4, 2022, 11:14 AM IST
पाणीपुरवठा बंद! मुंबईकरांनो सगळी कामं सोडून आधी 'ही' बातमी वाचा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : उन्हाळा संपण्याच्या टप्प्यावर असतानाच आता मुंबई शहरातील काही भागांत पाणीपुरवठ्याची अडचण भासू शकते. 7 जूनला मुंबईतील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद असेल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली 600 मिलीमीटर आणि 450 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीचं काम असल्यामुळं सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, दिनांक 8 जून, सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी सेवा प्रभावित होणार आहे. (no water in mumbais f south a b e and some other parts read details )

पालिकेच्या या कामामुळं सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

 एफ/दक्षिण विभागः
- रुग्णालय प्रभागः के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालय (24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

- शिवडी (पूर्व) विभागः शिवडी फोर्ट मार्ग, गाडी अड्डा शिवडी कोळीवाडा (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

- शिवडी (पश्चिम) विभागः आचार्य दोंदे मार्ग, टि. जे. मार्ग,  झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद (क्रॉस) मार्ग  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

- गोलंजी हिल पाणीपुरवठा –
अ) परळ गांवः गं. द. आंबेकर मार्ग 50 टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग,  नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

ब) काळेवाडीः परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकड (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

क) नायगांवः जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मार्केट, भोईवाडा गांव, हाफकिन – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

- अभ्युदय नगरः अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

- शिवडी वडाळा झोनः ज्ञानेश्वर नगर, जेरबाई वाडिया मार्ग  – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

- शहर उत्तर पाणीपुरवठाः दादर, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता –  (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

- शहर दक्षिण पाणीपुरवठाः लालबाग, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

- ई विभागः

अ. जे. जे. रुग्णालय (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

ब. म्हातार पाखाडी – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

क. डॉकयार्ड रोड – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

ड. हाथी बाग हुसेन्नी पटेल मार्ग – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

इ. रे रोड – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

फ. माऊंट रोड (घोडपदेव) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ग. बीपीटी –  (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)
ह. नेसबीट मार्ग, माझगांव - (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

-  बी विभागः

अ) संपूर्ण बी विभाग, बाबुला टँक क्षेत्रः
डोंगरी विभाग अ आणि ब – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ब) वाडी बंदर– (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

क) मध्य रेल्वे – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ड) बीपीटी विभाग – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

- ए विभागः बी. पी. टी., नेव्‍हल डॉकयार्ड आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रामगढ झोपडपट्टी, पी. डिमेलो मार्ग – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).