भाजीपाल्याची पुरेशी आवक नाही

प्रशासनाच्या पातळीवर बाजार सुरळीत राहून सर्वसामान्यांचे हाल होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येतेय. 

Updated: Jun 4, 2017, 11:28 AM IST
भाजीपाल्याची पुरेशी आवक नाही title=

मुंबई : शेतकऱ्यांच्या संप माघारीवरुन आणि संप सुरुच राहणार या संभ्रमात कालचा दिवस गेला. संप मागे घेण्यात आला असं काल जाहीर करण्यात आला, तरी पुणतांब्यासह सर्वच महाराष्ट्रात संपाची दाहकता कायम आहे. 

प्रशासनाच्या पातळीवर बाजार सुरळीत राहून सर्वसामान्यांचे हाल होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येतेय. 

 मुंबई बाजार समितीमध्ये 997 गाडयांची आवक झालीय. त्यात कांदा, बटाटा 89 गाडया तर भाजी 277 गाड्या आवक झालीय, तर पुण्यात रात्री 11.30 पर्यत 261 गाड्यांची आवक झाली होती. 

शेतकरी अजूनही संपाच्या पवित्र्यात असले तरी, बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक सुरु झाल्याने, बाजारपेठावरचा ताण काहीसा निवळल्याचे चित्र आज दिसत आहे. मात्र ही आवक आधी पेक्षा कमी आहे.