म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची! नितेश राणे यांचं ट्विट चर्चेत

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचार'

Updated: Feb 24, 2022, 04:29 PM IST
म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची! नितेश राणे यांचं ट्विट चर्चेत title=

मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काल ईडीने अटक केली. PMLA कोर्टाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 

नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री,आमदार, कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ आंदोलनाला केलं.  शिवसेनेनंही नबाव मलिक यांची पाठराखण केली आहे.

नितेश राणे यांचा शिवसेनेला टोला
नवाब मलिक यांना पाठिंबा देण्यावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलंय. 1993 च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना 93 च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची!!! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. 

नारायण राणे यांचा हल्लाबोल
एका देशद्रोही मंत्र्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करतात हे दुर्दैव आहे. खर तर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे करणं एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून कॅबिनेट मध्ये घेतलं आहे. आणि आज त्याच समर्थन करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. 

अशांना या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करत आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत. या पेक्षा वाईट गोष्ट नाही. उपोषणाला बसलेल्या सर्वांना देशद्रोह कायद्याखाली अटक केली पाहिजे असेही यावेळी नारायण राणे म्हणाले.

2024 मध्ये आमची सत्ता आली की तुम्हाला  बघून घेऊ असे म्हणणारे केवढेसे आहेत. पदासाठी लाचारी पत्करून हिंदुत्वाचा त्याग करून सत्तेत गेले आहेत. आणि आता दिल्लीची सत्ता घेणार असे म्हणत आहेत, असा टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. भाजपचे 301 खासदार आहेत. मोदींच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार  निवडून आले पुढच्या वेळी 5 पण येणार नाहीत केंद्राची स्वप्न पाहण्यापेक्षा राज्यातील घडामोडी बघा असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.