दहिसरमध्ये ६ घर कोसळल्याने एकाचा मृत्यू, ३ जण अडकल्याची शक्यता

मुंबईत मालवणी भागात बुधवारी रात्री बिल्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जण ठार तर 8 जण जखमी आहेत. 

Updated: Jun 10, 2021, 09:43 PM IST
दहिसरमध्ये ६ घर कोसळल्याने एकाचा मृत्यू, ३ जण अडकल्याची शक्यता

मुंबई : दहिसरमध्ये ६ घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे दहिसर केतकीपाडा परिसरात शिवाजी नगर याठिकाणी सहा घरे कोसळली आहेत. या दुर्घटनेत तीन व्यक्ती अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दल ,पोलीस, महानगरपालिका यांच्या कडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

मुंबईत मालवणी भागात बुधवारी रात्री बिल्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जण ठार तर 8 जण जखमी आहेत. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. या इमारतीला तौत्के चक्रीवादळावेळी तडा गेला होता. 

कॉन्ट्रॅक्टरने दुरूस्ती केल्यावर ही इमारत आणखी धोकादायक बनली होती. ही इमारत अनधिकृत होती अशी माहिती मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.