विरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत

विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.  

Updated: Nov 14, 2020, 11:06 AM IST
विरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत - संजय राऊत    title=

मुंबई : विरोधकांनी सरकार (Maharashtra Government) पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत, असा स्पष्ट इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कुठलंही ऑपरेशन होणार नसून पाच वर्ष उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहणार असल्याचंही विधान राऊत यांनी केले.

महाविकासआघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi government) पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारला थोडेह खरचटले नाही. असे अघोरी प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी कल्याणासाठी सहकार्याची भावना ठेवावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना पुन्हा इशारा दिला. विरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत असं संजय राऊत म्हणालेत. महाराष्ट्रात कोणतही ऑपरेशन होणार नसून ५ वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदावर कायम असतील असं ते म्हणालेत. किरीट सोमय्यांनी खोटेनाटे आरोप करणं बंद करावं आणि जुनी थडगी उकरु काढणं थांबवावे, असे राऊत म्हणालेत. 

आम्ही जुनी थडकी उकरुन काढल्यास तुमच्या पापांचे सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा संजय राऊत यांनी सोमय्यांना दिला. त्याचवेळी सोमय्यांना त्यांच्याच पक्षात गांभिर्यांने घेतले जात नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सोमय्यां यांनी ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावे, असे कोणतंही महान त्यांनी केलेले नाही. ते जे करतात त्याच्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचं त्यांनी भान ठेवावे, असे ते म्हणाले.