मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्याला चोप, पैसे घेऊन काम केले नाही!

पैसे घेऊनही काम केलं नाही म्हणून मंत्रालयातच एका सरकारी अधिकाऱ्याची धुलाई करण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला.

Updated: Sep 12, 2018, 04:11 PM IST
मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्याला चोप, पैसे घेऊन काम केले नाही!

मुंबई : पैसे घेऊनही काम केलं नाही म्हणून मंत्रालयातच एका सरकारी अधिकाऱ्याची धुलाई करण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला.

उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केली. आश्रम शाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानित करण्यासाठी निटुरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला पैसे दिले आहेत. परंतु पैसे घेऊनही अधिकारी काम करत नसल्यामुळे त्यांनी मंत्रालयात जाऊन या अधिकाऱ्याला चोप दिला.