विमान अपघातानंतर पायलटच्या पतीचे गंभीर आरोप

मारिया यांच्या पतीनं केले गंभीर आरोप 

Updated: Jun 28, 2018, 10:49 PM IST
विमान अपघातानंतर पायलटच्या पतीचे गंभीर आरोप title=

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सहवैमानिक मारिया यांच्या पतीनं गंभीर आरोप केले आहेत. खराब हवामान असतानाही यू वाय कंपनीनं उड्डाण करायला भाग पाडल्याचा आरोप मारियाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केलाय. मारियाशी आपला सकाळी संवाद झाला होता. त्यावेळी तिनं आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा प्रभात यांनी केला आहे. प्रदीप राजपूत यांचंही तेच म्हणणं होत असंही प्रभात यांनी सांगितलं आहे. एक वाजता कुठे आहे, असा मारियाला मेसेज केला होता. मात्र मारियाकडून प्रतिसाद आला नाही. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्यानं भीती वाटू लागली. त्यानंतर बातम्यांमध्ये विमान दुर्घटनेचं वृत्त कळल्याची माहिती प्रभात यांनी दिली.

मारिया ही मूळची अहमदाबादची असून ती को-पायलट होती. मारिया १५ वर्षांपासून मुंबईतल्या मीरा रोडला राहत होती. तिला १५ वर्षांची मुलगी आहे.  मारियाला १ हजार तासांचा विमान उडवण्याचा अनुभव होता.