Uddhav Thackeray: शिवसेनेतील अंतर्गत वादानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं आहे. उद्धव ठाकरे यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत वाद निर्माण झाला आणि युती तुटली. अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या काळात तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या. शेतकऱ्यांना अपुरी मदत, कोरोना संकट, पालघर येथे साधूंची हत्या प्रकरण, सुशांतसिंह प्रकरण, कंगना राणौत प्रकरण, मराठा आरक्षणावरुन भाजपने महाविकास आघाडीवर अनेक आरोप-प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. शिवसेना कार्याध्यक्ष ते पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा प्रवास राहिला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक चढउतार पाहिले.
मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेले निर्णय
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने नवी मुंबई विमानतळाच्या दि.बा. पाटीलांच्या नावाला मंजुरी, औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले.