महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागली आहे.  

Updated: Nov 12, 2019, 06:14 PM IST
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट title=

मुंबई : महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागली आहे. राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला होता. भाजप - शिवसेना युतीत चर्चा न झाल्याने भाजपने सत्ता स्थापन करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेला विचारणा करण्यात आली. मात्र, संख्याबळ न झाल्याने शिवसेनेला अपयश आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण राज्यपाल यांनी दिले. त्यांना आज रात्री ८.३० वाजण्याची वेळ दिली होती. त्याआधीच संध्याकाळी राज्यपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे राज्यात ही तिसऱ्यांना राष्ट्रपती राजवट लागली आहे.

राष्ट्रपती राजवट लागू

राष्ट्रवादीला वेळ दिली असताना दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकीय परिस्थिचा अंदाज आणि राष्ट्रपती लागू करण्याचा प्रस्ताव दिल्लीत पाठवला होता. राज्यपालांनी मात्र ट्विट करून 'राष्ट्रपती राजवटीची शिफारस सूचित करणारे पत्र पाठवण्यात आल्याचे' स्पष्ट केले होते. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला अशी माहिती राजभवनाने दिली. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार अहवाल सादर केला होता.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. याआधी १९८० मध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यानंतर २०१४ आणि आता २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भात शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल मांडण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत कपिल सिब्बल तसेच काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.